श्री गिरीजात्मक लेण्याद्री
अष्टविनायकांपैकी हा सहावा गणपती आहे.. "गिरीजात्मक लेण्याद्री" हे
जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेंण्य़ाच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात
डोंगरावर श्री गिरीजात्मक गणेशाचे स्वयंभू स्थान आहे..श्री गणेशाची प्रसन्न मूर्ति
असून टी दगडामधे कोरलेली आहे..मंदिर परिसरातील खडकामधे कोरिव्काम, खोदकाम केले
आहे..पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोधार झाला..मंदिरात दगडी खाम्ब आहेत व् त्यावर
वाघ, सिंह हत्ती असे सुंदर नक्षीकाम केले आहे..मंदिरात जाण्य़ासाठी सुमारे ४००
पायरया आहेत..लेण्याद्रीचा श्री गिरीजात्मक हा जुन्नरपासुन ७ किमी अंतरावर आहे..तर
पुण्यापासून सुमारे ९७ किमी अंतरावर आहे..या गणेशाची स्थापना पार्वती मातेने स्वहस्ते
केली..येथे ज्या गुहेत तिला श्री गणेश प्रसन्न झालेत्याच गुहेत तिने श्री गणेशाची
स्थापना केली..हे स्थान उंच डोंगरावर असून लेण्यांच्या समुहात आहे..गिर्रीजा
म्हणजे पार्वती मत आणि पर्वतिचा पुत्र गणेश म्हणजे तिचा आत्मज त्यावरून त्यास
गिरीजात्मक असे म्हंटले जाते..येथे एकुण २८ लेन्या आहेत मंदिर ६ व्या लेनित असून
त्याला गणेश लेनी असे म्हणतात..६ व्या लेनित बैद्ध स्तूप असून येथे सात वेळा
आवाजाचा पतिध्वनी उमटतो..लेनिस जाण्यासाठी ३२१ पायरया आहेत..गणेशाची मूर्ति
लेनिच्या भितितुंन स्वयंभू प्रकट झालेली आहे..डोंगरात कोरलेले हे मंदिर अखंड अशा
एकाच दगडात कोरलेले असून दक्षिणाभिमुख आहे..
Visit Web Address =
http://bhatkantipravas.blogspot.in/
YouTube Channel =
https://www.youtube.com/channel/UCYR1wyNr6gI4YFMfH62uTrA
No comments:
Post a Comment