?

Pages

Showing posts with label अष्टिविनायक. Show all posts
Showing posts with label अष्टिविनायक. Show all posts

Tuesday, 26 July 2016

अष्टिविनायक यात्रा-श्री बल्लाळेश्वर पाली

श्री बल्लाळेश्वर पाली

अष्टविनायकांपैकी  हा आठवा गणपती आहे..या गणपतीला "श्री बल्लाळेश्वर" असे म्हणतात.. श्री बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे..मंदिर पूर्वाभिमुख आहे..गनेहाचे कपाळ विशाल असून डोळ्यावर हीरे आहेत..मंदिर चिरेबंदी आहे..मंदिरात प्रचंड घंटा असून टी चिमाजी अप्पानी अर्पण केली आहे..हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असुन, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी या अंबा नदीच्या निसर्गरम्य सानिध्यात श्री बल्लाळेश्वर मंदिर वसलेले आहे..पालिपासून जवलळच गरम पाण्याचे झरे व हा प्राचीन किल्ला आहे..पाली-खोपोलिपासून ३८ किमी अंतरावर आहे तर पुण्याहून १११ किमी अंतरावर आहे..भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणि यात्रा भरते..भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुरदशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.. अष्टविनायकांच्या आठही ठिकाणी यात्रा भरते..आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम सोय आहे.. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तिन जिल्ह्यातून प्रवास होतो..निरनिराऴ्या रुपात श्री गणेशमूर्ती आहेत..त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत..त्यामुऴॆ अष्टविनायकाची यात्रा करणारया भाविकाला यात्रेबरोबराच पर्यटनाचा अनुभव होतो...


अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापूर्ति नाही, तर सपूर्ण भारतभर पसरली आहे.............

-----------------------------------------------------धन्यवाद----------------------------------------------------

Visit Please : https://bhatkantipravas.blogspot.com

YouTube Channel : https://www.youtube.com/channel/UCYR1wyNr6gI4YFMfH62uTrA

अष्टिविनायक यात्रा-श्री वरदविनायक महाड़

श्री वरदविनायक महाड़

अष्टविनायकांपैकी  हा सातवा गणपती आहे..हे स्वयम्भू स्थान असून याला मठ असेही म्हटले जाते.. "श्री वरदविनायक" मंदिर हे साधे कौलारू असून मंदिराला घुमट आहे..त्याला सोनेरी कळस आहे..या मंदिराची एक कथा अशी आहे की एका भक्ताला स्वप्नात मंदिराच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ति दिसली..त्याप्रमाणे तय व्यक्तीने शोध घेतला व् मूर्ति मिळाली..तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ति आहे..मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ति सिन्हासनारुढ आहे व् उजव्या सोंडेची आहे..इ.स. १७२५ व्या शतकात पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले..रायगड जिल्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रिय महामार्गावर खोपोली-खालापुरच्या दरम्यान आहे..पुण्यातील पेशवे हे थोर गणेशभक्त होते..माधवराव पेशव्यांचे थेउरला निधन झाल्यावर त्याना सती गेलेल्या रमाबाई यांची समाधि आहे..मंदिराच्या परिसरात थोरल्या मधवरावांची कारकीर्द वर्णन करणारे कलात्मक दालन आहे...हे दालन निर्गुडकर फ़ौंडेशनच्या वतीने तयार करण्यात आले आहे..




Monday, 25 July 2016

अष्टिविनायक यात्रा-श्री विघ्नेश्वर ओजर

श्री विघ्नेश्वर ओजर

अष्टविनायकांपैकी  हा पाचवा गणपती..येथील श्रींची मूर्ति लांब रुंद असून अष्टविनायकांपैकी सर्वांत श्रीमंत गणपति म्हणून "श्री विघ्नेश्वराला" ओळखले जाते..श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे..अशी प्रसन्न व् मंगल मूर्ति असलेला श्री गणेश विघ्नांचे हरण करतो..म्हणून या गणपतिला  विघ्नेश्वर असे म्हणतात..ही गणेशाची स्वयंभू मूर्ति आहे..हे मंदिर एक जागृत स्थान आहे..मंदिराच्या परिसरात भाविकाना रहाण्याची धर्मशाळेची सोय आहे..जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रिपासुंन १४ किमी वर तर पुण्यापासून ८५ किमी अंतरावर आहे..मंदिराला दगडी तटबंदी आहे..मंदिर पूर्वाभिमुख आहे..मंदिराचा कळस व् शिखर सोन्याचा आहे..प्रवेश्द्वाराच्या डॉन बाजुला दगडात कोरलेले भालदार-चोपदार आहेत..मंदिरात प्रवेश करताच काऴ्या पाषाणातील उन्दिराची मूर्ति आहे..मंदिराच्या भिंतीवर चित्रकाम केले आहे..सभामंडपातुन आत गेल्यावर देवाचा गाभारा आहे..गाभारयात डौलदार कमानित बसलेली पूर्ण कृतितील विघ्नेश्वराची डाव्या सोंडेची मूर्ति आहे..मूर्तीच्या दोन डोळ्यात माणके असून कपळावर व् बेम्बीत हीरे आहेत..या मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धि-सिद्धि पितळाच्या मूर्ति आहेत..



अष्टिविनायक यात्रा-श्री गिरीजात्मक लेण्याद्री

श्री गिरीजात्मक लेण्याद्री

अष्टविनायकांपैकी  हा सहावा गणपती आहे.. "गिरीजात्मक लेण्याद्री" हे जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेंण्य़ाच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरीजात्मक गणेशाचे स्वयंभू स्थान आहे..श्री गणेशाची प्रसन्न मूर्ति असून टी दगडामधे कोरलेली आहे..मंदिर परिसरातील खडकामधे कोरिव्काम, खोदकाम केले आहे..पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोधार झाला..मंदिरात दगडी खाम्ब आहेत व् त्यावर वाघ, सिंह हत्ती असे सुंदर नक्षीकाम केले आहे..मंदिरात जाण्य़ासाठी सुमारे ४०० पायरया आहेत..लेण्याद्रीचा श्री गिरीजात्मक हा जुन्नरपासुन ७ किमी अंतरावर आहे..तर पुण्यापासून सुमारे ९७ किमी अंतरावर आहे..या गणेशाची स्थापना पार्वती मातेने स्वहस्ते केली..येथे ज्या गुहेत तिला श्री गणेश प्रसन्न झालेत्याच गुहेत तिने श्री गणेशाची स्थापना केली..हे स्थान उंच डोंगरावर असून लेण्यांच्या समुहात आहे..गिर्रीजा म्हणजे पार्वती मत आणि पर्वतिचा पुत्र गणेश म्हणजे तिचा आत्मज त्यावरून त्यास गिरीजात्मक असे म्हंटले जाते..येथे एकुण २८ लेन्या आहेत मंदिर ६ व्या लेनित असून त्याला गणेश लेनी असे म्हणतात..६ व्या लेनित बैद्ध स्तूप असून येथे सात वेळा आवाजाचा पतिध्वनी उमटतो..लेनिस जाण्यासाठी ३२१ पायरया आहेत..गणेशाची मूर्ति लेनिच्या भितितुंन स्वयंभू प्रकट झालेली आहे..डोंगरात कोरलेले हे मंदिर अखंड अशा एकाच दगडात कोरलेले असून दक्षिणाभिमुख आहे..

Visit Web Address =  
http://bhatkantipravas.blogspot.in/

YouTube Channel  =  

https://www.youtube.com/channel/UCYR1wyNr6gI4YFMfH62uTrA

अष्टिविनायक यात्रा-श्री महागणपती रांजणगाव

श्री महागणपती रांजणगाव

अष्टविनायकापैकी  हा चौथा गणपती..या गणपतीला "श्री महागणपती" असे म्हणतात..हे श्री महागणपतीचे स्वयंभूस्थान आहे..पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे..या स्थानासंदर्भात एक कथा अशी आहे की त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकाकरानी कही शक्ति प्रदान केल्या होत्या..या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोक व् पृथ्वीलोक येथील लोकाना त्रास देऊ लागला..शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकाकराना श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुचा वध करावा लागला..म्हणून या गणेशाला महागणपती असे म्हंटले जाते.. अष्टविनायकापैकी सर्वाधिक शक्तिमान असे म्हागणपतिचे रूप आहे..श्री महागणपति उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळIचे आसन आहे.. अष्टविनायकातील सर्वात शक्तिमान असे मानल्या जाणारया महागणपतिचे मंदिर पूर्वाभिमुख आहे..मंदिराचे काम पेशवेकालीन पद्धतीचे आहे..या मंदिराचे वैशिष्ट्य असे की उत्तरायण व् दक्षिणायन  यांच्या मधल्या काळात सुर्याची किरणे महागणपतीचा मुर्तिवर पड़तात..मंदिरातील सभामंडपातुन आत गेल्यावर गाभारयात महागणपतीची डाव्या सोंडेची मूर्ति आहे..

Visit Web Address =  
http://bhatkantipravas.blogspot.in/

YouTube Channel  =  
https://www.youtube.com/channel/UCYR1wyNr6gI4YFMfH62uTrA


अष्टिविनायक यात्रा-श्री सिद्धिविनायक सिद्धटेक

श्री सिद्धिविनायक सिद्धटेक 

सिद्धटेकचा "सिद्धिविनायक" हा अष्टविनायकपैकी तीसरा गणपति..हे भीमानदिवर वसलेले सिद्धिविनायक
स्वयंभू स्थान आहे..याचा गाभारा लांबी रुन्दिनी फार मोठा आहे..तसेच मंदिर ही मोठे प्रशस्त आहे..पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करुंन मंदिर बांधले आहे..मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र सूर्य गरुड़ यांचा प्रतिमा आहेत..अहमदनगर जिल्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण आहे..
दौंड पासून १९ किमी अंतरावर आहे..तर राशिनपासून २३ किमी अंतरावर भीमा नदीकाठी सिद्धिविनायकाचे

मंदिर वसलेले आहे..या ठिकाणी विष्णुला सिद्धि प्राप्ति झाली म्हणून या गणपतीला सिद्धिविनायक आणि या परिसराला सिद्धटेक अस म्हंटल जात..भगवान विष्णुनी येथील गणपतीची स्थापना केलि..अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा हा एकमेव गणपति आहे..त्यामुळे याचे सोहळ खुप कड़क असते.. गणेशास सकाळी खिचड़ी व दुपारी महानेवैद्य व संध्याकाळी दुधभात व रात्रि भिजलेल्या डाळीचा नेवैद्य असतो..हे मंदिर उत्तराभिमुख आहे..मंदिराचा महाद्वारावर नगारखाना आहे..आत गेल्यावर सभामंडप आहे..आणि त्यापुढे गाभरा आहे..गाभाऱ्यात शेंदुर लावलेली उजव्या सोंडेची सिद्धिविनायकची मूर्ति आहे..त्याची एक मुंडी दुमडलेलि असून त्यावर रिद्धि सिद्धि बसलेल्या आहेत..गाभारयातील मखर पितळाची असून त्यावर चंद्र, सूर्य, गरुड़, नागराज यांच्या आकृति कोरल्या असून दोन्ही बाजूला जय विजय आहेत..

Sunday, 24 July 2016

अष्टिविनायक यात्रा-श्री चिंतामणि थेऊर

श्री चिंतामणि थेऊर



अष्टविनायकांपैकी थेऊरचा "चिंतामणि" हा दूसरा गणपति आहे..थेऊरचा कदम्ब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे..भक्तांच्या चिंतेचे हरण करणार म्हणून या गणपतीला चिंतामणि असे म्हंटले जाते..पुण्याच्या पेशव्यांचा घरातील अनेक जण थेऊरला येत असतात..पेशवे घराणे हे खुप मोठे गणेशभक्त होते..थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यानी केला..थेऊर पुणे-सोलापुर महा महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर तालुक्यात असून हे ठिकाण पुणेहुन ३० किमी अंतरावर आहे..पुण्याहुन बसेसचि सुविधा आहे..येथील गणेश मूर्तिची स्थापना कपिल मुनिनी केलि..कपिल मुनिन जवळजवळ एक रत्न होते..ते रत्न त्यांची सर्व इच्छा पूर्ति करायचा..एकदा गनासुर त्यांचा आश्रमात आला असता, त्यानी या रत्नाचा सहाय्याने त्याला पँचपक्वानाचे जेवण खाऊ घातले..हे पाहुन गनासुर स्तंभित झाला..त्यास रत्नाचा मोह निर्माण झाला..त्याने त्यात्या रत्नाची मागणी केलि..पण मुनिनी ते देण्यास नकार दिला..ते रत्न गणासुराराने हिस्कावुंन घेतले..कपिल मुनिनी गणेशाची उपासना केलि..गणेश प्रसन्न झाले..व तेथील कदम्वृक्षाखाली गुणाराचा पारिपात्य केला..तेव्हा मुनिनि ते रत्न विनायकंचा गळ्यात घातले..तेव्हापासून गणेशाला चिंतामणि नावाने सभोदले जाते..


अष्टिविनायक यात्रा-श्री मयूरेश्वर मोरगाँव

श्री मयूरेश्वर मोरगाँव



अष्टिविनायकांपैकी पहिला गणपति म्हणजे "मोरगावचा मोरेश्वर".
या गणपतिस श्री मयूरेश्वर असेही म्हंटल जातजात..
थोरथोर गणेश भक्त मोरया गोसावी यांनी येथील पुजेचा वसा घेतला होता..
श्री म्युरेश्वराचे हे स्वयम्भू स्थान आहे..प्रत्येक घरात म्हंटली जाणारी "सुकरता दुखहर्ता" ही आरती रामदास स्वामी यांनी याच मंदिरात स्फुरली होती अस म्हंटल जातजात..
जवळच करहां ही नदी आहे..मंदिरावर अनेप्रकारचे नक्षीकाम केले आहे.
श्री मोरेश्वरचा डोळ्यात व बेम्बित हिरे बसवले आहेत..
या मंदिराचा भोवती प्राचीन काळापासून दगडी काम केले आहे..पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाँव हे ठिकाण आहे..मोरगाँव हे ठिकाण पुण्यापासून सुमारे ७० किमी आहे..तर बरामतिपासून ३५ किमी अंतरावर आहे..महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरिचा खंडोबा हे मोरगाँव पासून अगदी १७ किमी अंतरावर आहे..मंदिराचा भोवती चारही दिशेला चार मिनारासारखे खाम्ब आहेत..मन्दिराला पायऱ्या असून तिथे पायात लाडू धरलेला उंदीर आहे..मंदिराचा गाभारयात डाव्या सोंडेची म्युरेश्वराची मूर्ति आहे..मूर्तिचा बाजूला ऋद्धिसिद्धिचा पितळेचा मुर्त्या आहेत..

?