श्री सिद्धिविनायक सिद्धटेक
सिद्धटेकचा "सिद्धिविनायक" हा अष्टविनायकपैकी
तीसरा गणपति..हे
भीमानदिवर वसलेले सिद्धिविनायक
स्वयंभू
स्थान आहे..याचा
गाभारा लांबी रुन्दिनी फार
मोठा आहे..तसेच
मंदिर ही मोठे
प्रशस्त आहे..पुण्यश्लोक
अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार
करुंन मंदिर बांधले
आहे..मंदिरात पितळी
मखर असून त्याभोवती
चंद्र सूर्य गरुड़
यांचा प्रतिमा आहेत..अहमदनगर जिल्यातील कर्जत
तालुक्यात हे ठिकाण
आहे..
दौंड पासून १९ किमी
अंतरावर आहे..तर
राशिनपासून २३ किमी
अंतरावर भीमा नदीकाठी
सिद्धिविनायकाचे
मंदिर वसलेले आहे..या
ठिकाणी विष्णुला सिद्धि प्राप्ति
झाली म्हणून या
गणपतीला सिद्धिविनायक आणि या
परिसराला सिद्धटेक अस म्हंटल
जात..भगवान विष्णुनी
येथील गणपतीची स्थापना
केलि..अष्टविनायकांपैकी उजव्या
सोंडेचा हा एकमेव
गणपति आहे..त्यामुळे
याचे सोहळ खुप
कड़क असते.. गणेशास
सकाळी खिचड़ी व
दुपारी महानेवैद्य व संध्याकाळी
दुधभात व रात्रि
भिजलेल्या डाळीचा नेवैद्य असतो..हे मंदिर
उत्तराभिमुख आहे..मंदिराचा
महाद्वारावर नगारखाना आहे..आत
गेल्यावर सभामंडप आहे..आणि
त्यापुढे गाभरा आहे..गाभाऱ्यात
शेंदुर लावलेली उजव्या सोंडेची
सिद्धिविनायकची मूर्ति आहे..त्याची
एक मुंडी दुमडलेलि
असून त्यावर रिद्धि
सिद्धि बसलेल्या आहेत..गाभारयातील
मखर पितळाची असून
त्यावर चंद्र, सूर्य, गरुड़,
नागराज यांच्या आकृति कोरल्या
असून दोन्ही बाजूला
जय विजय आहेत..
No comments:
Post a Comment