श्री बल्लाळेश्वर पाली
अष्टविनायकांपैकी हा आठवा गणपती आहे..या गणपतीला "श्री बल्लाळेश्वर" असे
म्हणतात.. श्री बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे..मंदिर पूर्वाभिमुख
आहे..गनेहाचे कपाळ विशाल असून डोळ्यावर हीरे आहेत..मंदिर चिरेबंदी आहे..मंदिरात
प्रचंड घंटा असून टी चिमाजी अप्पानी अर्पण केली आहे..हे स्थान रायगड जिल्ह्यातील
सुधागड तालुक्यात असुन, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी या अंबा नदीच्या
निसर्गरम्य सानिध्यात श्री बल्लाळेश्वर मंदिर वसलेले आहे..पालिपासून जवलळच गरम
पाण्याचे झरे व हा प्राचीन किल्ला आहे..पाली-खोपोलिपासून ३८ किमी अंतरावर आहे तर
पुण्याहून १११ किमी अंतरावर आहे..भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणि यात्रा
भरते..भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुरदशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र
साजरा केला जातो.. अष्टविनायकांच्या आठही ठिकाणी यात्रा भरते..आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम सोय
आहे.. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तिन जिल्ह्यातून प्रवास
होतो..निरनिराऴ्या रुपात श्री गणेशमूर्ती आहेत..त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे
नदीकाठी आहेत..त्यामुऴॆ अष्टविनायकाची यात्रा करणारया भाविकाला यात्रेबरोबराच पर्यटनाचा अनुभव होतो...
अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापूर्ति नाही, तर सपूर्ण भारतभर पसरली
आहे.............
-----------------------------------------------------धन्यवाद----------------------------------------------------
Visit Please : https://bhatkantipravas.blogspot.com
YouTube Channel : https://www.youtube.com/channel/UCYR1wyNr6gI4YFMfH62uTrA